Ashadhi Ekadashi : माऊली... माऊलीच्या गजरात उत्साहात दिंडी सोहळा

माऊली माऊली व विठ्ठल विठ्ठल जय हरी गजरात आणि बालगोपाल विठ्ठल रूखमिनी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई यांचा वेशभुषात दिंडीत सहभागी झाले होते.
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi : माऊली... माऊलीच्या गजरात उत्साहात दिंडी सोहळाfile photo
Published on
Updated on

Mauli... Dindi ceremony with excitement to the sound of Mauli

जवळा बाजार, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानोबा तुकाराम माऊली, माऊली च्या गजरात पंढरीची वारी सजते या वारीमध्ये प्रत्येक वारकरी एकमेकामध्ये विठ्ठलाचेच रूप पाहून आपुलकीने आणि आदराने एकमेकाना माऊली म्हणून हाक मारतो. हिच वारकरी पंरपरातील लीनता, समानता आणि संस्कार आजचा विधार्थी मध्ये रूजावेत याच उद्देशाने विविध शाळेतील वृक्षदिंडी, वारकरी दिंडी, बालगोपाल दिंडी, ग्रंथ दिंडी आषाढी एकादशी निमित्त येथील विविध अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय मुल व मुली मोठ्याप्रमाणात गावातील मुख्य मार्गावरून आषाढी दिंडी टाळमृदंग माऊली माऊली व विठ्ठल विठ्ठल जय हरी गजरात आणि बालगोपाल विठ्ठल रूखमिनी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई यांचा वेशभुषात दिंडीत सहभागी झाले होते.

Ashadhi Ekadashi
Beed News : ९ लाखांची दुरुस्ती कागदावरच; थेराला शाळेची भिंत कोसळली

२५ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक भक्त २४ जुलै रोजी सकाळपासूनच दर्शन रांगा पहावयास मिळत आहेत. इंदिरा गांधी कन्या विद्यालय सकाळी ९ वाजता आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली पाणी व फराळ व्यवस्था भाविक भक्त कडून नियोजन करण्यात आले होते शाळेत वारकरी मेळावा, रिंगण, फुगडी मुलीनी विविध वेशभुषात दिंडीत सहभाग घेतला.

संस्थाचे स्थानिक अध्यक्ष मुरलीधर मुळे, सहसचिव प्रा. गजानन मुळे, मुख्याध्यापक उध्दवराव राखोंडे, पर्यवेक्षक पांडुरंग दशरथे व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते. बाराशिव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालय कडून वृक्षदिडी टाळमृदंग गजरात काढण्यात आली विविध वेशभुषात दिडीत सहभागी झाले होते मुरलीधर मुळे, साहेबराव शिंदे सहसचिव प्रा. गजानन मुळे, प्राचार्य सुनिता कातोरे, उपमुख्याध्यापक अशोक दाडगे, पर्यवेक्षक लक्ष्‌मीकांत कोपले व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.

Ashadhi Ekadashi
Beed News : विद्यार्थ्यांच्या दिंडीने रायमोहकरांची मने जिंकली

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय कडून आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्राचार्य एस एम डुकरे, प्राचार्य यु. एच मुथळ, प्रा एस ई पांचाळ, प्रा पि बि राठोड, पी आर वंजे कर्मचारीवर्ग सहभाग घेतला. रिसर्च इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र हि साधुसंताची भूमी व भारतीय संस्कृती जतन करणे ग्रंथ दिंडी माध्यमातून वारी स्वच्छ वारी, आमची वारी सुंदर वारी, बाल वारी आदर्श निर्माण होण्यासाठीच ग्रंथ दिंडी टाळमृदंग गजरात विविध वेशभूषात बालगोपाल दिंडीत सहभागी झाले होते संस्थेचे अध्यक्ष एस बी चकोर, प्राचार्य वैष्णवी एस चकोर, पुष्पा चव्हाण, स्वाती बागल, पल्लवी जाधव, प्रतिक्षा लोखंडे, तारामती पारवे व पालकवर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते. ब्रिलियंट इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित विठ्ठल रूखमिनी पालखी टाळमृदंग गजरात काढण्यात आली.

या मध्ये मुस्लिम समाजाचे भाऊ व बहीण विठ्ठल रूखमिनी वेशभुषात आलीशा शेख व जिशान शेख केली होती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहन कदम बोडर्डीकर, संजना कदम बोर्डीकर, शिला बोंडारे, अलका शेळके, निकीता तळणकर, अमृता घोडेकर, रूपाली काटकर अदि परिश्रम घेतले. युनिक इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित दिंडी विठ्ठल नामा गजरात काढण्यात आली या मध्ये बालकानी विविध वेशभूषात संताचे सहभागी झाले होते संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य प्रल्हादराव कदम, सचिव अर्चना कदम, मुख्याध्यापक गजानन अंभोरे, विष्णु धबडगे, विशाल कदम, गोदावरी टिकले, वैष्णवी चटप, श्रध्दा कदम, कुंता चव्हाण, मयुरी सावंत, कृतिका चव्हाण, साधना पारडे, गौकुळा भारती, अंबाली बुजुर्ग, द्वारका पवार, संगीता मनोरे, मनिषा मुळे, नारायण नाईकनवरे व पालकवर्ग उपस्थितीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news