illegal gambling raid : माळवटा शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

9.79 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
illegal gambling case
माळवटा शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापाFile Photo
Published on
Updated on

वसमत : तालुक्यातील माळवटा शिवारात गायरान जमीनीवर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एक कार, सहा मोबाईलसह 9.79 लाख रुपय्‌ांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 10 जणांवर शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले.

तालुक्यातील माळवटा शिवारात मागील काही दिवसांपासून बाहेरगावाहून येणाऱ्या जुगारी झन्नामन्ना जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलिसांनी माहिती घेतली.

illegal gambling case
illegal sand mining : नांदेडमध्ये वाळूमाफियांवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

दरम्यान, सदर जुगारी रात्रीच्या वेळी येऊन जुगार खेळत असल्याची खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, जमादार विजय उपरे, आंबादास विभुते, जे. के. शेख, नामदेव बेंगाळ, रामा लोखंडे, विनायक जानकर यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साडे आकरा वाजता साध्या वेशात जाऊन छापा टाकला.

यावेळी त्या ठिकाणी 10 जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक स्विफ्ट कार, सहा मोबाईल व रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा 9.79 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

illegal gambling case
‌Atal Bihari Vajpayee statue Nanded : ‘काँग्रेसमय‌’ नांदेड भाजपाचा वाजपेयी यांच्या पुतळ्यास अग्रक्रम!
  • या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बोराटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी धोंडीबा बागल (रा. बागलपार्डी), मन्मथ उदगिरे (रा. जवळापांचाळ), दादाराव नादरे (रा. गिरगाव), राजू पवळे (रा. जानापुरी, जि. नांदेड), प्रफुल्ल शिंदे (रा. नांदेड), सोनाजी निळकंठे (रा. सोडेगाव), राधेशाम आळणे (रा. मनाठा), ज्ञानेश्वर माखणे (रा. रुंज) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक डक पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news