Leopard Attack | वारंगटाकळी शिवारात बिबट्याचा हल्ला; वासराचा फडशा

Leopard Attack | विदर्भ मराठवाडा सीमा भागातील पैनगंगा नदीकाठच्या वारंगटाकळी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा उपद्रव वाढल्याची घटना समोर आली आहे.
Leopard Attack
Leopard Attack File photo
Published on
Updated on

Leopard Attack | विदर्भ मराठवाडा सीमा भागातील पैनगंगा नदीकाठच्या वारंगटाकळी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा उपद्रव वाढल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने शेतीमधील आखाड्यावर बांधून ठेवलेल्या शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या वासराचा फडशा पाडला, आणि ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leopard Attack
Wani Protest March : वणीतील हजारो नागरिकांचा संतप्त निषेध मोर्चा

या भागात गेल्या वर्षीही अशाच प्रकारे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केले होते. काही काळ परिस्थिती शांत होती; परंतु यंदा पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. जनावरांचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान तर होतेच, पण रात्री शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनतो.

परिस्थिती अशी उघडकीस आली…

शेतकरी अशोक हाके यांनी रोजच्या प्रमाणे आपल्या जनावरांना रात्रीच्या वेळी आखाड्यावर बांधले होते. मात्र पहाटे जेव्हा ते जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले तेव्हा एका वासराचा मृतदेह दिसला. जवळून पाहिल्यावर हे काम दिवसा नव्हे तर रात्री हल्ला करणाऱ्या बिबट्याचं असल्याचं स्पष्ट झालं. शेतकऱ्यांनी तात्काळ ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी अमोल कदम, पशुवैद्यकीय अधिकारी योगेश ऐवतीकर आणि वनरक्षक यमजलवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा पंचनामा केला. तपासात हल्ल्याचे ठसे, प्राण्याच्या मृत्यूची स्थिती आणि ओढून नेण्याचे खुणा पाहता, हा हल्ला बिबट्याचाच असल्याची खात्री पटली.

Leopard Attack
BMC Election 2025 | मुंबईत मतदारयादी डाऊनलोड बंद; मनसेचा गंभीर आरोप

ऊसाच्या फडात दडून बसतो बिबट्या

वारंगटाकळी परिसर ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. बांबूसारखे उंच वाढणारे आणि दाट असणारे ऊसाचे फड हे बिबट्यासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी लपण्याची उत्तम जागा ठरतात.
वनविभागाच्या प्राथमिक तपासातही बिबट्या या ऊसाच्या फडात दडून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वन अधिकारी अमोल कदम यांनी सांगितले की,
“या भागात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा सहज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्री शेतात एकटे जाणे, जनावरे एकटे सोडणे किंवा आखाडा उघडा ठेवणे टाळावे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news