illegal sand mining fine : कंत्राटदाराला 85 लाखांच्या दंडाची नोटीस

पिंपरी येथील वाळू घाटावरील उत्खनन प्रकरण, खुलासा करण्याचे दिले आदेश
illegal sand mining fine
कंत्राटदाराला 85 लाखांच्या दंडाची नोटीसpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील वाळूघाटावरील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल 85 लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी दिली. या प्रकरणी 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारातील वाळूघाटाचा लिलाव झाला होता. सदर लिलावातून वाळू घाट सिध्दांत बिल्िंडग मटेरियलचेे सिध्दांत नरवाडे कुपटी यांनी घेतला आहे. या वाळू घाटाच्या लिलावामध्येच सर्व अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाळू घाटातून नियमानुसार 890 ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत होते. त्यानुसार या ठिकाणी वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती.

illegal sand mining fine
Land Survey: लवकरच राज्यात खासगी भूमापन संस्थांद्वारे मोजणी सुरु; १५ दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार : चंद्रशेखर बावनकुळे

मात्र वाळू घाटावर चार बोटीद्वारे वाळू उपसा करून चार जेसीबीद्वारे वाळू व मुरुम भरून 11 हायवा द्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने 27 मार्च रोजी रात्री छापा टाकला असता त्या ठिकाणी काही हायवामध्ये मुरूम तर काही हायवामध्ये वाळू आढळून आली. तसेच घाटावरील जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्याचे काम केले जात असल्याचे पथकाला दिसून आले.

त्यावरून सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने चार बोटी जाळून नष्ट केल्या तर 11 हायवा व चार जेसीबी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यामध्ये 890 ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात 1000 ब्रास वाळू उपसा केल्याचे अहवालात नमूद केले या शिवाय लिलावातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

illegal sand mining fine
Tringalwadi Fort Igatpuri: इगतपुरीतील त्रिंगलवाडी दुर्गत्रयी : सह्याद्रीच्या कुशीतला ऐतिहासिक वारसा
  • उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी सिध्दांत बिल्िंडग मटेरियलचे सिध्दांत नरवाडे यांना नोटीस दिली असून यामध्ये एकूण दंडात्मक रक्कम 85.70 लाख रुपये का आकारले जाऊ नये तसेच पुढील काळात अनाधिकृतरीत्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणार नाही याचे बंध प्रमाणपत्र का घेण्यात येेऊ नये याचा खुलासा 48 तासांत सादर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भुते यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news