Hingoli Crime : पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कार्यवाही

दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली केली जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कळमनुरी : कळमनुरी पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांनी मोहीम राबवली. या दरम्यान दोन दिवसात २ ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना पकडले.

तालुक्यातील नांदापूर येथील रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर व ट्रॉलीवर वर २१ जून रोजी कळमनुरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर हेडला क्रमांक नसलेले वाहन व विनापरवाना वाळू वाहतूक करणारी ट्रॉली आढळून आली. तसेच ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरलेली होती.

Crime News
Ratnagiri Crime : काजू फॅक्टरी फोडणारे दोघे जेरबंद

या मोहिमेत पो. नि. जमीर नाईक यांच्यासह जमादार कार्तिक हराळ पो. कर्मचारी शेख रहीम, विलास बांगर, शुभम घुगे, आदी सहभागी होते या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, १ लाख ५० हजार रुपये किमतीची ट्रॉली आणि ६ हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२२ जून रोजी पुयना शिवारात मोहीम दरम्यान अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडण्यात आले व एकूण ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Beed crime | डिघोळअंबा शिवारात तलावातून मुरूम उत्खनन करताना 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले

याप्रकरणी पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संग्राम सांगळे व सतीश शेळके पुढील तपास करीत आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांच्याकडून सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहिमेमुळे अवैध धंदे चालकांमध्ये घाबरट निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news