

Kalamnuri Mahadev Mandir Temple Theft
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून 25 हजार रोख रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराचे पुजारी गंगाधर नारायणराव पांचाळ (वय ६५, ) , यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ७.३० वाजता ते मंदिर बंद करून गेले होते. बुधवारी (दि. ७) सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मंदिर उघडण्यासाठी आल्यानंतर दानपेटी तुटलेल्या अवस्थेत आढळून आली.
अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दानपेटीतील अंदाजे २५,००० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपी अज्ञात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. आर. गोटके करीत आहेत.