Hingoli Congress Morcha : विविध मागण्यांसाठी कळमनुरीत काँग्रेसचा मोर्चा

महसूल प्रशासनास निवेदन, ज्ञानेश कुमारांच्‍या राजीनाम्‍याचीही मागणी
Hingoli Congress Morcha
कळमनुरी : तहसीलदारांशी चर्चा करताना काँग्रेसचे पदाधिकारी. pudhari photo
Published on: 
Updated on: 

कळमनुरी : अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, तसेच हळद उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा व कळमनुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ‌‘वोट बचाओ, देश बचाओ‌’ अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

शहरातील लमानदेव परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विविध घोषणाबाजी करून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Hingoli Congress Morcha
Beed Crime : ‘इकोसँड’च्या आडून अवैध वाळू वाहतूक

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादनात घट, पिकांचे नुकसान आणि वाढता आर्थिक ताण लक्षात घेता बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी एक लाख रुपये अनुदान तातडीने जमा करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही अटीशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

कळमनुरी तालुक्यासह परिसरात हळद उत्पादक शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई विलंब न करता द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच ‌‘वोट बचाओ, देश बचाओ‌’ अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Hingoli Congress Morcha
Bhagwan Gad Mahant: तेलंगणात जन्‍म, अध्यात्‍माकडे ओढ, भगवानगडावर शिक्षण, कोण आहेत गडाचे चतुर्थ महंत कृष्‍णा महाराज शास्त्री?

लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधत विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, सरसकट कर्जमाफी आणि पीकविम्याची भरपाई देण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • या मोर्चात काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी रेहानाजी चिश्ती, जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, ॲड. जकी कुरेशी, डॉ. रमेश शिंदे, शेख बाबा, उमर फारूक शेख, डॉ. साहेबराव देवकते, ॲड. प्रदीप नाईक, डॉ. स्मिता शहापूरकर, सीमा हफीज,, दत्ताराव जाधव कांतराव शिंदे, सादेक नाईक, परवेज अहमद, साद पठाण, फैसल खान, सादत पठाण, भगवान खंदारे साईनाथ जाधव, सूरज कदम, बबन डुकरे, यासिन कुरेशी आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news