हिंगोली : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारसह १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारसह १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते रामेश्वर रोडवर कारमधून बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ३० हजार सातशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई औंढा नागनाथ पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान केली.

याबाबत अधिक माहिती अशी, हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत. त्यानुसार औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी आज (दि.२९) आपल्या पथकासह औंढा नागनाथ परिसरात पेट्रोलिंग सुरू केले. यादरम्यान त्यांना आल्टो कार (क्रमांक एम.एच.२६ व्ही १०६३) मधून बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार औंढा नागनाथ ते रामेश्वर रोड दरम्यान नाकाबंदी करत त्यांनी १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, पोलीस आमलदार ढाकरगे, गजानन गिरी, पोलीस जमादार संदीप टाक यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news