

Hongoli Political News Shinde Faction Candidate BJP
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा पालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून एकमेकांना चांगलेच धक्के देणे सुरू असून गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराने माघार घेत शिंदेसेनेत प्रवेश केलो. त्यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.
हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक होत आहे. तीन ठिकाणी तीन नगराध्यक्षांसह हिंगोलीत १७प्रभागांतन ३४ कळमनुरीत १९ प्रभागांतन २० तर वसमतमध्ये १५ प्रभागांतून ३० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. तिन्ही पालिकांमधून काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी बहरंगी लढतीचे चित्र आहे.
दरम्यान, तिन्ही पालिकांतून आता उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. आपापले प्रभाग सुरक्षित करण्यासाठी बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी बैठकांनाही ऊत आला असून इच्छुक उमेदवारांना कोणाला पक्षात चांगल्या पदावर तर कोणाला स्विकृत सदस्य म्हणून घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. नेत्यांच्या आश्वासनावर माघारीसाठी प्रयत्न होत आहेत. हिंगोली पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा व मध्चन भाजपाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
आमदार संतोष बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला. भाजपाच्या उमेदवाराच्या माघारीमुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपा व शिंदेसेनेत पडलेली दरी वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जिल्ह्यात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाला जय श्रीराम करून शिंदेसेनेत प्रवेश केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.