हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार

हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील नागपूर – वारंगा महामार्गावरील वारंगा फाटा येथे ट्रकने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.१७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. बालाजी अंकुश दैठणेकर (वय २३, रा. खांबेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर – वारंगा महामार्गावरून आज सकाळी ५ वाजता वटाण्याच्या शेंगा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 26 बी इ 8191) नागपूर येथून लातूरकडे होता. यावेळी वारंगा फाट्याजवळ हा ट्रक समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकला. या अपघाताची बातमी कळताच वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे बीट जमादार रोहिदास राठोड, प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. बालाजी याचा मृतदेह केबिन बाहेर काढून डोंगरकडा येथे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news