खंडाळा (जि. हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथे एका २६ वर्षीय पदवीरधर तरूणाने आपले जीवन संपविले. ही घटना आज (दि. ९) सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. विठ्ठल दत्तराव गायकवाड (वय २६, रा. खंडाळा ता. जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे पदवीधर होवूनही नोकरी मिळत नाही, बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याची खंत विठ्ठल बोलून दाखवित असे, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
खंडाळा येथील विठ्ठल दत्तराव गायकवाड याचे शिक्षण बी.एसस्सी पर्यंत झाले होते. परंतु, अनेकवेळा प्रयत्न करूनही नोकरी लागत नव्हती. तसेच हाताला कामही मिळत नाही. त्यामुळे विठ्ठल गायकवाड मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यामुळे त्यांने टोकाचे पाऊल उचलले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सकाळी ११ च्या समारास मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला होता.
हेही वाचा