Hingoli Accident : डोंगरकडा शिवारात भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बसची विद्युत खांबाला धडक, वीज पुरवठा नसल्याने गंभीर प्रसंग टळला
Hingoli Accident News
डोंगरकडा शिवारात भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

हिंगोली : वारंगाफाटा ते नांदेड मार्गावर डोंगरकडा शिवारात भरधाव एसटीने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी पावने सहा वाजता घडली. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस विद्युत खांबाला धडकली. सुदैवाने विज पुरवठा खंडीत असल्याने गंभीर प्रसंग टाळला.

Hingoli Accident News
Aundha Nagnath Accident | औंढा नागनाथ येथे भरधाव २ दुचाकींची धडक; ४ जण गंभीर जखमी

नांदेड आगाराची हदगाव ते नांदेड बस मंगळवारी सायंकाळी पावनेसहा वाजण्याच्या सुमारास डोंगरकडा शिवारात आली होती. यावेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिस व नागरीकांनी त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता शिवाजी वाघमाेडे (रा. करवाडी, जि. नांदेड) असे त्या व्यक्तीचे नांव असून तो वरुड येथील एका आश्रमशाळेवर काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.

दरम्यान, या अपघातानंतर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळली. मात्र सुदैवाने यावेळी विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Hingoli Accident News
Amravati Accident : गाडीचा टायर तपासणं बेतलं जीवावर; भरधाव १२ चाकी ट्रक आला अन्...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news