औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यासह हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे सिद्धेश्वर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. आज (दि.२) ९८ टक्के धरण भरल्याची माहिती विभागीय अभियंता सय्यद खालिद यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले सिद्धेश्वर धरण ९८ टक्के भरल्यामुळे लाभक्षेत्रातील उन्हाळी व हिवाळी हंगामासाठी सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे हिंगोलीसह परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास ५७ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. यंदा पावसाळ्यात सतत अनिश्चिततेचे सावट होते, त्यामुळे धरण भरेल याची शाश्वती नव्हती. परंतु परतीच्या पावसाने धरण परिसरात जोरदार हजेरी लावल्यामुळे सिद्धेश्वर तलावात पाण्याचे मोठ्या प्रमाणात आवक झाली. आठ दिवसापूर्वी ५० टक्केच्या आत असलेले सिद्धेश्वर धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा