

Sengaon tehsildar office protest
सेनगाव : संपूर्ण राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड कहर केल्याने खरीप हंगामातील शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या वाढीव मदत अतिवृष्टी यादीमध्ये हिंगोली व सेनगाव या तालुक्यांचा समावेश न केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात सेनगाव तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीवर शेतातील सोयाबीन उधळून राज्य शासनाचा आज (दि.१०) तीव्र निषेध नोंदविला.
संपूर्ण राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असून या अतिवृष्टीत हिंगोली जिल्ह्यातील प्रचंड शेत पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना राज्य शासनाने वेळीच आर्थिक मदत गरजेचे असताना राज्य शासनाकडून नुकत्याच जाहीर केलेल्या वाढीव मदत अतिवृष्टी यादीमध्ये जिल्ह्यातील सेनगाव व हिंगोली या तालुक्यांचा समावेश न झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाप्रमुख संदेश देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी सेनगाव तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीवर सोयाबीन आणून त्याची उधळण करून निषेध व्यक्त केला.
यादरम्यान त्यांनी घोषणा करत सेनगाव हिंगोली या तालुक्यांचा अतिवृष्टी वाढीव मदत या यादीत तात्काळ समावेश करावा येणाऱ्या दोन दिवसांमध्ये सदर यादीमध्ये समावेश न झाल्यास शासन व प्रशासनात यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी प्रशासनास सुनावला असून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा यासह वाढीव मदत अतिवृष्टी यादीत सेनगाव हिंगोली तालुक्यांचा समावेश तात्काळ करा.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, युवा नेते प्रवीण महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे पाटील, बी. आर. नाईक, संदीप आदमने, पांडुरंग देशमुख आदी उपस्थित होते.