Hingoli Crime | जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांचा छापा; १.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पानकनेरगाव शिवारातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कठोर कारवाई
Hingoli Gambling Raid
Hingoli Gambling RaidPudhari
Published on
Updated on

Hingoli Gambling Raid

सेनगाव : सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानकनेरगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १९ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

पोलिसांना पानकनेरगाव बीट अंतर्गत शेतशिवारात काही व्यक्ती ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

Hingoli Gambling Raid
Hingoli News : महिलांच्या पहिल्या पंक्तीची परंपरा कायम

या कारवाईत रोख ३ हजार ४०० रुपये, तीन मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली असा एकूण १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री, अवैध दारू, मटका आणि जुगार यांसारख्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी हद्दीतील सर्व अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत.

Hingoli Gambling Raid
Hingoli Smart Meter Protest : ‘स्‍मार्ट मीटर’ची सक्‍ती बेकायदेशीर

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम जाधव व पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार राजेश जाधव, राम मारकळ आणि सेनगाव पोलीस पथक करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news