

Hingoli Local Body Elections
सेनगाव : तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून सर्वच राजकीय पक्ष कमालीचे कामाला लागले असल्याचे पहावयास मिळत आहे त्या अनुषंगाने आज 13 ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील पंचायत समिती 20 गणातील आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली असून यामध्ये तालुक्यातील अनुसूचित जाती करिता चार गण राखीव ठेवण्यात आले. त्यामध्ये दोन गन हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी कायम ठेवले असून एक गण हा महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जाहीर करण्यात आला. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) करता 5 गण राखीव असून त्यापैकी 3 गण हे ओबीसी महिला राखीव ठेवण्यात आले.
तर सर्वसाधारण खुला प्रवर्ग साठी 10 गण राखीव करण्यात आले असून त्यापैकी सर्वसाधारण महिलाकरिता 5 गण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये पुढे कंसात दिलेले गावाचे नाव व त्यासमोर आरक्षित गण त्यामध्ये अनुसूचित जाती महिला राखीव (43 सवना= अनुसूचित जाती महिला) (46 माझोड=अनुसूचित जाती महिला) अनुसूचित जाती सर्वसाधारण मकोडी, बाभुळगाव हे राखीव ठेवण्यात आले आहे. तर अनुसुचित जमाती मकोडी हा गण आरक्षित करण्यात आला. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) वटकळी, वरुड चक्रपान, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला) आजेगाव, जयपुर, कापड सिंनगी तर उर्वरित १० गण हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.
त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी कडोळी, जवळा बु, साखरा, ब्रह्मवाडी, पुसेगाव हे पाच पंचायत समिती गण सर्वसाधारण साठी आरक्षित ठेवण्यात आले. तर उर्वरित ५ पंचायत समिती गण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोरेगाव, पानकनेरगाव, हत्ता, भानखेडा, सापडगाव हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर करण्यात आले आहेत.
निवडणूक नियंत्रण अधिकारी रामेश्वर रोडगे निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार मिलिंद वाकळे, निवडणूक लिपिक अंकुश सोनटक्के, संगणक ऑपरेटर विनोद चिलगर आदींच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली
सेनगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी कुमार खंदारे, शहर बीट अंमलदार सुभाष चव्हाण, पोलीस जमादार संतोष जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.