Sand Mining Raid | सेनगाव–जिंतूर पूर्णा नदी परिसरात धडक कारवाई; पोक्लेनसह ५२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli Sand Mining | पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासन व पोलिसांनी मध्यरात्री संयुक्त धडक कारवाई
 Purna River illegal sand mining
Purna River illegal sand mining Pudhari
Published on
Updated on

Purna River illegal sand mining

सेनगाव : पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासन व पोलिसांनी मध्यरात्री संयुक्त धडक कारवाई करत ५२.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार (दि. २५) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान बन-वझर (ता. सेनगाव–जिंतूर) परिसरात करण्यात आली.

विशेष पथकाने नदीपात्रात बोटी, तराफे आणि पोक्लेन मशीनच्या साहाय्याने सुरू असलेले अवैध उत्खनन रंगेहाथ पकडले. या कारवाईत लोखंडी पाईप बसवलेली बोट, तराफे, अंदाजे दोन ब्रास रेती तसेच एक पोक्लेन मशीन जप्त करण्यात आले.

 Purna River illegal sand mining
Illegal Sand Mining : नांदेडमध्ये वाळू तस्करावर कारवाई, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

ही मोहीम राहुल गुप्ता (जिल्हाधिकारी), डॉ. निलाभ रोहन (पोलीस अधीक्षक), उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस कर्मचारी तुळशीराम वंजारे, चालक अंभोरे तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी डाखुरे (साखरा), नायब तहसीलदार दिलीप गायकवाड, मंडळ अधिकारी एम. एम. पठाण, शेख अन्वर, तलाठी भीमराव वाकळे आणि राजेश हिसेकर यांनी सहभाग घेतला.

 Purna River illegal sand mining
Illegal sand mining : वाळू चोरी प्रकरण, महसूल विभाग आक्रमक

तालुका सीमेलगत घटनास्थळ असल्याने जिंतूर तहसीलचे नायब तहसीलदार दिलीप गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाणे येथे पोक्लेन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पर्यावरण संरक्षण आणि शासन महसुलाचे रक्षण करण्यासाठी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news