Hingoli Accident | हिंगोलीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू; नागरिकांत हळहळ

वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल
Accident News
Accident NewsPudhari File Photo
Published on
Updated on

हिंगोली - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Accident News
नावातील तफावतीमुळे अपात्र ठरवण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द; उमेदवाराला दिलासा

वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (३१) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सय्यद माजीद हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

Accident News
Hingoli hanging case | धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याने जीवन संपवले

या प्रकरणी शेख मतीन यांच्या तक्रारीवरून कार चालका विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत. तर दुसऱ्या अपघाताच्या अन्य एका घटनेत औंढा नागनाथ तालुक्यात बेरुळा येथील नवनाथ दाभाडे (३०) हे नांदखेडा शिवारातून जात असतांना भरधाव ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नवनाथ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

या प्रकरणी मनिषा दाभाडे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी ट्रॅक्टर चालक प्रभाकर मात्रे याच्या विरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news