Hingoli bribe case : 14 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी चतुर्भुज

सातबारा फेरफारसाठी मागितली लाच, एसीबीची कारवाई
Hingoli bribe case
14 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी चतुर्भुजpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली ः सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराच्या वडिलोपार्जीत जमिनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी 14 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी रात्री 7 वाजता सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील एका तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन हक्कसोड वाटणीतून तक्रारदाराच्या नावे आली होती. सदर जमिनीचा फेरफार करून सातबाराला नांव लावण्यासाठी त्यांनी तलाठी सज्जा येथे अर्ज दाखल केला होता. मात्र ग्राम महसूल अधिकारी रामेश्वर रोडगे याने 22 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी रोडगे याने 8 हजार रुपयांची रक्कम घेतली.

Hingoli bribe case
women officers corruption case | दोन महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

उर्वरित रक्कम देण्याची ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पडताळणी करण्यात आली. यावेळी रोडगे याने सेनगाव येथे 14 हजार रुपये आणून देण्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे थांबल्याचे सांगत तेथे येण्याचे सांगितले.

Hingoli bribe case
Ahilyanagar PMAY Bribery Case: प्रधानमंत्री आवास योजनेत लाच प्रकरण; ग्रामसेविका-इंजिनिअरविरोधात गुन्हा, इंजिनिअर रंगेहाथ पकडला

यावेळी तक्रारदाराकडून 14 हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकारी रामेश्वर रोडगे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, शेख शकील, विजय शुक्ला, भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, गजानन पवार, अमोल जाधव, शिवाजी वाघ, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news