Parbhani Crime : परभणीत कार्यकर्त्याच्या घरावर गुंडांचा हल्ला

कारवर दगडफेक; शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी, कटाचा संशय
Parbhani Crime News
परभणीत कार्यकर्त्याच्या घरावर गुंडांचा हल्लाpudhari photo
Published on
Updated on

परभणी : अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनातील लाल सेनेचे सक्रिय कार्यकर्ते कॉ. गणपत भिसे यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारची अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.

या घटनेत कारचे सुमारे १ लाखांचेे नुकसान झाले असून, आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आंदोलनाशी संबंधित वैमनस्यातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Parbhani Crime News
Nanded illegal medicine sale : नांदेडमध्ये विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यावर छापा

शहरातील रामनगर भागातील कॉ. गणपत भिसे यांनी याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण आंदोलनात सक्रियपणे कार्यरत आहेत. रविवारी रात्री सुमारे ११ वाजता जेवण करून ते घरी विश्रांती घेत असताना सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेरून आरडाओरडा आणि अश्लील शिवीगाळ करण्याचा आवाज आला.

आवाज ऐकून ते घराबाहेर येण्यासाठी निघाले असता, कुटुंबीयांनी त्यांना रोखले. बाहेर दोन अज्ञात व्यक्ती उभ्या राहून त्यांना बाहेर येण्याचे आव्हान देत सातत्याने शिवीगाळ करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेे.

Parbhani Crime News
Re-NEET 2026 result : नीट निकालात आयआयबीचे विद्यार्थी ठरले धुरंधर!

भिसे बाहेर न आल्याने संतप्त झालेल्या दोघांनी घरासमोर उभी असलेल्या टाटा झेस्ट (एमएच-२२ यू-७२३२) या चारचाकी वाहनावर मोठमोठे दगड फेकले. या दगडफेकीत वाहनाच्या समोरील बाजूच्या काचा पूर्णपणे फुटल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news