illegal sand transport : भल्या पहाटे वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले

१५.१० लाखांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांवर गुन्हा
Hingoli illegal sand transport
Hingoli illegal sand transportpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : शहरात पोलिसांची नजर चुकवून भल्या पहाटे वाळू वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता पकडलेे. यामध्ये टिप्परसह १५.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली आहे. शहरी व ग्रामीण भागातून बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे, जुगार, मटका अड्डे यांची माहिती घेऊन छापासत्र सुरु करण्यात आले आहे. या शिवाय गुटखा वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

Hingoli illegal sand transport
Solapur crime: मोहोळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

या शिवाय वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी विविध पथके स्थापन केली आहेत. या शिवाय हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर यांनीही दोन पथके स्थापन करून माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर भागात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे टिप्पर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, बाबासाहेब कांबळे, अंभोरे यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे चार वाजल्या पासून वाहनांची तपासणी सुरू केली होती.

Hingoli illegal sand transport
Crime News : भररस्त्यात तलवार उगारून रिक्षाचालकाला मारहाण

साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक टिप्पर पोलिसांनी थांबविले. यावेळी टिप्पर चालक लखन घुगे (रा. भगवा, ता. औंढा), याची चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केले आहे.

  • या प्रकरणी जमादार कांबळे यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक लखन व दीपक कऱ्हाळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार अंभोरे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news