Opium plants seized Vasmat
Opium plants seized Vasmat Pudhari

Hingoli Crime | वसमत तालुक्यात १ क्विंटल ७७ किलो अफूची झाडे जप्त; एक जण ताब्यात

वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात पोलिसांचा छापा
Published on

Opium plants seized Vasmat

वसमत : तालुक्यातील सिरळी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल १ क्विंटल ७७ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख ५४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी (दि.१७) पहाटे कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात अवैध व्यवसाय, वाळू वाहतूक आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अफू व गांजाच्या लागवड व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके कार्यरत आहेत.

Opium plants seized Vasmat
Hingoli News : हिंगोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

दरम्यान, सिरळी शिवारातील एका शेतात लसणाच्या पिकामध्ये अफूची झाडे लावल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार भुजंग कोकरे तसेच गजानन पोकळे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे, संदीप टाक, साठे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री सिरळी शिवारात शोधमोहीम राबविली.

रात्री सुमारे अकराच्या सुमारास पथक प्रताप नलगे (रा. सिरळी) यांच्या शेतात पोहोचले असता लसणाच्या पिकामध्ये अफूची झाडे लावलेली आढळून आली. सुमारे चार गुंठे क्षेत्रात ही लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी सर्व झाडे उपटून त्यांचे वजन केले असता एकूण वजन १ क्विंटल ७७ किलो इतके भरले.

Opium plants seized Vasmat
Hingoli News : मिळालेल्या कर्जातून गावात दुधक्रांती करावी

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रताप नलगे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news