

BJP condemns Congress state president's statement in Hingoli
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याचा आरोप करीत या वक्तव्याचा रविवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील गांधी चौकात निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाने सपकाळ यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावे कशी मागणी करत निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, रजनीश पुरोहित, प्रशांत सोनी, नगरसेवक उमेश गुढे, कैलाश शहाणे, संदीप वाकडे, पवन उपाध्याय, विलास गोरे, बाबा घुगे, संजय ढोके, सदाशिव सुर्यतळ, विश्वास बांगर, शंकर जोजार, गुड्डू देवकते, निखिल बांगर, लखन कुरिल यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.