Hingoli Crime : नराधम बापाकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल; गुंगीच्या गोळ्या देऊन दहा वर्षांपासून छळ
Sexual assault Case
Sexual assault Casepudhari
Published on
Updated on

हिंगोली : जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरीच्या निमित्ताने हिंगोलीत राहणाऱ्या एका निवृत्त जिल्हा परिषद शिक्षकानेच स्वतःच्या गतिमंद मुलीवर तब्बल दहा वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम वडिलाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी शिक्षक हिंगोली जिल्ह्यात नोकरीला असताना कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी सोबत राहत नव्हती. मात्र, तो आपल्या गतिमंद मुलीस हिंगोली येथे सोबत ठेवत असे. सन २०१६ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंत मुलगी अल्पवयीन तसेच गतिमंद असताना, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्याने वारंवार अत्याचार केला. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर तो गावी गेला.

Sexual assault Case
kalyan Crime | कल्याणात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर!

दरम्यान, मुलीच्या आईने प्रकृतीच्या तपासणीसाठी तिला नागपूर येथील रुग्णालयात नेले होते. तेथे वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे उघड झाले. आईने विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आईने नागपूर पोलिसांत तक्रार दिली. घटना हिंगोली येथील असल्याने गुन्हा हिंगोली शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे आणि उपनिरीक्षक युवराज वाघमारे यांचे पथक पुढील तपास करत आहेत.

Sexual assault Case
Sangli Crime: सांगलीत वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news