Hingoli News : शिक्षकांच्या मागणीसाठी सीईओंच्या दालनात ठिय्या

हिवरखेडा शाळेला तात्काळ एक शिक्षक मंजूर
Hingoli News
Hingoli News : शिक्षकांच्या मागणीसाठी सीईओंच्या दालनात ठिय्याfile photo
Published on
Updated on

Hingoli News: Teachers stage a sit-in protest in the CEO's office to press for their demands

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याविरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले.

Hingoli News
Sanitation Workers Strike : मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सीईओ विवेक गायकवाड यांनी संबंधित शाळेसाठी तत्काळ एक वाढीव शिक्षक देण्याची ग्वाही दिली.

या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यापूर्वी दोनदा निवेदन देऊनही कार्यवाही झाली नव्हती. उर्वरित पदे लवकर न भरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा घोंगडे यांनी दिला.

Hingoli News
Shenodi Atrocity Case : शेनोडी प्रकरणातील आरोपींना अटक करा

यावेळी अमोल घोंगडे, भारत वाकळे, रवींद्र गडदे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news