Shiv Sainik : जवळा बाजारच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहून दाखवली निष्ठा

जवळा बाजारच्या युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे यांनी स्वतःच्या रक्ताची शाई करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे.
Hingoli News : जवळा बाजारच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहून दाखवली निष्ठा
Hingoli News : जवळा बाजारच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहून दाखवली निष्ठाfile photo
Published on: 
Updated on: 

Hingoli News: Shiv Sainik from Javla Bazar demonstrates loyalty by writing a letter in his own blood

जवळा बाजार : पुढारी वृत्तसेवा शिवसैनिकांच्या जीवावर जे मोठे झाले आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख असे अनेक पदे मिळविली त्यांनीच शिवसेना सोडली मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अश्या आशयाचे पत्र जवळा बाजारच्या युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे यांनी स्वतःच्या रक्ताची शाई करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे.

Hingoli News : जवळा बाजारच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहून दाखवली निष्ठा
Hingoli Politics : हिंगोलीत पुन्हा लाल दिव्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांमध्ये उभी फूट पाडल्याने शिवसेनेत अभूतपूर्ण संकट आले आहे आमदारांपाठोपाठ खासदार देखील उद्धव ठाकरे व शिवसेनेला सोडून गेले होते. त्यांच बरोबर आताच थोड्या दिवसापूर्वी काही खासदार ही सोडून गेल्याने सर्व शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत.

आमदार, खासदार, पदाधिकारी जरी पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य शिवसैनिक मात्र अद्याप पक्षासोबत आहेत. अनेक प्रकारे शिवसैनिक स्वतःची निष्ठा दाखवत आहेत. जवळा बाजार येथील एका शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पक्षावरील निष्ठा दाखविली आहे. मी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र एक शिवसैनिक म्हणून सादर केले आहे ज्यांना ज्यांना शिवसेनेने मोठे केले असे आमदार, खासदार, पदाधिकारी हे सर्वजण आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत.

Hingoli News : जवळा बाजारच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहून दाखवली निष्ठा
Irrigation Project : जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या

मात्र शिवसेना या चार अक्षरापासून मिळालेली ओळख हेच सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी पुरेसे आहे ते आजही तनमनधनाने उद्धव ठाकरे साहेबांच्या व शिवसेनेच्या सोबत आहेत. शिवसेना ही चार अक्षरे ज्वलंत ठेवण्यासाठी परिश्रम घेतील असा आशावाद चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला आहे. रक्ताची शाई करून लिहिलेले प्रतिज्ञापत्र मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन ते पत्र त्यांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे यांनी दिली.