Hingoli news | हिंगोलीला मिळणार राज्यसभेचा खासदार

रामराव वडकुते यांना भाजपाकडून 'लॉटरी', तातडीने मुंबईला पाचारण
Hingoli news | हिंगोलीला मिळणार राज्यसभेचा खासदार
Published on
Updated on

हिंगोली : माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भाजपाकडून राज्यसभेची लॉटरी लागणार असून त्यांना तातडीने मुंबई येते बोलावण्यात आले आहे. त्यानुसार वडकुतेंसह भाजपाचे पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे हिंगोलीला राज्यसभेचा खासदार मिळणार आहे.

माजी विधान परिषदेचे सदस्य वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. यापुर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळावर सन 2002 मध्ये वर्णी लागली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने सन 2004 मध्ये कळमनुरी विधानसभेतून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतरचही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून वर्णी लावली होती.

मात्र मात्र सन 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपाकडून कळमनुरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतरही त्यांनी भाजपात राहणेच पसंत केले. भाजपाच्या हिंगोली लोकसभा प्रभारी तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांनाच आता राज्यसभेसाठी वडकुते यांच्या नावावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार त्यांना तातडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईत पोहोचण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यानुसार वडकुते हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे यावेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊन त्यांना राज्यसभेची लॉटरी लागणार आहे. तर जिल्ह्यासाठी राज्यसभेचा खासदार मिळणार असल्याने जिल्हयात भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news