Hingoli News : महावितरणचे अधीक्षक अभियंता चव्हाण निलंबित

तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले.
Hingoli News
Hingoli News : महावितरणचे अधीक्षक अभियंता चव्हाण निलंबितFile Photo
Published on
Updated on

Hingoli News: Mahavitaran Superintending Engineer Chavan suspended

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी वीज कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी काढले आहेत.

Hingoli News
Hingoli News : बसवरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत, विद्यार्थिनीच्या जीवाशी खेळ

हिंगोलीचे वीज कंपनीचे कार्यालय मागील काही वर्षांपासून या-ना त्या कारणावरून गाजत आहे. यापुर्वी वीज कंपनीच्या कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या रोहित्र बसविण्याचे प्रकरण गाजले होते. यामध्ये बीआयएस स्टँडर्डचे रोहित्र बसविण्यात आले नाही. या संदर्भातील अहवाल देखील छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशीक अभियंता कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र सदर अहवालावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

त्यानंतर आता रोहित्र बसविण्याचे कामही केले जात असून काही ठिकाणी हि कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. एवढेच नव्हे तर सेनगाव तालुक्यात एका शेतात अनाधिकृतरित्या रोहित्र बसवून वीज वाहिन्या देखील अंथरण्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी एकाव्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Hingoli News
Hingoli Red Alert | हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट : मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरुच आहे. दरम्यान, आता जिल्हा नियोजन समितीमधून नर्सी नामदेव येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम सन २०२५-२६ मंजूर करण्यात आले आहे. या कामांचे कार्यारंभ आदेश १४ नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आले. सदर काम ए. आर. इलेक्ट्रीकल्स अॅड इंजिनियर्स या कंत्राटदारास देण्यात आले.

सदर ठेकेदाराने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ५०.३७ लाख रुपये रकमेचे देयक सादर केले. त्यामध्ये अधिक्षक अभियंता चव्हाण यांनी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणीत केले अन देयक अदा केले. या प्रकरणात मंजूर अंदाजपत्रक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रशासकिय मान्यतेप्रमाणे सदर काम झाले नसल्याचे निदर्शनास आले असून यावरून पायाभुत सुविधा उभारणीसाठी देण्यात आलेल्या या निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news