

हयातनगर ः वसमत तालुक्यातील हयातनगर व परिसर हा बहुतांश कोरडवाहू क्षेत्रात मोडतो.केवळ बोटावर मोजण्या इतके क्षेत्र येलदरी व सिध्देश्वर धरणातुन व काही भाग विहीर व बोअरवेलवर भिजतो अशी साधारण या भागातील शेतीची भौगोलिक परिस्थिती आहे. या भागात कापुस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. नैसर्गिक संकटांमुळे कापसाचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.
गेल्या काही चार ते पाच वर्षांपासून कापुस उत्पादन कमी होताना दिसत आहे. या वर्षी तर कापूस उत्पादनात घट झाल्याने अनेक कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण कापुस उत्पादन हे साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून सुरू होते. हे पिक नगदी पिक म्हणून ओळखले जाते.
कापूस पिक चांगले आले तर फेब्रुवारी मार्चपर्यंत जाते असे अनेक जानकर शेतकरी सांगतात. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून कापूस पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट झाल्याने या भागातील शेतकरी वर्गांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होतांना दिसत आहे.
कापसावर प्रचंड खर्च होत आहेत त्यातच महागामोलीचे खते, औषधी भरमसाठ वाढ व उत्पन्न कमी यामुळे शेतकरी वर्गाचे कापुस उत्पादनातुन प्रचंड नुकसान झाले आहे. हयातनगर परिसरातील कापुस कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.
माझ्याकडे तीन एकर शेत जमीन असुन महागामोलाचे खते, औषधी व कापूस व्यवस्थापन देखिल व्यवस्थित केले. मात्र एकरी दोन क्विंटल कापूस झाला, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
उध्दव लक्ष्मण सारंग, शेतकरी
माझ्याकडे दोन एकर शेती आहे. या वर्षी खरिपात कापसाची एक बॅग लागवड केली होती. पण या वर्षी मला कापूस उत्पादनातुन माझ्या केलेला खर्च ही निघाला नाही. त्यामुळे कापुस उत्पादन घटल्याने आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली.
भागाराम लक्ष्मण आवटे, शेतकरी.