

औंढा नागनाथ : येथून जवळच असलेल्या खांडेश्वरी देवीमंदिरा समोर छोटा हत्ती व दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा युवक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
डिग्रस कहऱ्हाळे येथून छोटा हत्ती क्रमांक २६ एच ९५४६ कोचा घेऊन शिरडशहापूर कडे जात होता. वगरवाडीहुन दुचाकी क्रमांक एम एच २२ बीजे १४९७ या पल्सर गाडीवरवर दोन युवक औंढा नागनाथकडे येत असताना खांडेश्वरी मंदिर देवीच्या मंदिरासमोर जोराची धडक होऊन दुचाकीवरील गजानन मंचकराव कदम वय २३ रा. वगरवाडी हा जागीच ठार झाला तर सुरज बाळासाहेब उबाळे वय २६ रा. वगरवाडी यास अपघात स्थळावरून नरेंद्र महाराज रुग्णसेवा रुग्णवाहिकेतून औंढा नागनाथ येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
छोटा हत्तीचा चालक नवनाथ पुरभाजी कऱ्हाळे रा. डिग्रस याला पुढील उपचारासाठी औंढानागनाथवरून नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. राज्य महामार्गाचे खयामुद्दीन खतीब व पोलीस राजाराम कदम, प्रमोद थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अमोल इंगोले, जमादार वसीम पठाण, सय्यद शायद, शेख इकबाल, माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळपंचनामा केला.