Hingoli water crisis Kayadhu river dry |हिंगोलीची जीवनवाहिनी पडली कोरडीठाक

पाणीटंचाईचे संकट गडद होण्याचे संकेत; रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत
कयाधू नदी
कयाधू नदी Pudhari photo
Published on: 
Updated on: 

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी सध्या पूर्णपणे कोरडी पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्याने या नदीला पूर आला नाही. त्यामुळे कयाधू नदी पात्रात नाल्याचे खराब पाणी सोडले तर नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांसाठी महत्वाचा जलस्रोत मानली जाते. नदीच्या पाण्यावर शेती, जनावरे तसेच विविध दैनंदिन गरजांसाठी नागरिक अवलंबून असतात. मात्र, यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस आणि नदीला पुरेसा प्रवाह न मिळाल्याने नदीची स्थिती चिंताजनक बनली आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट असून, नदीच्या काठावरील गावांमध्येही भविष्यात पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी यांसह विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, कयाधू नदी कोरडी पडल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आगामी काळात पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही, तर पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एकीकडे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाची आशा बाळगून असताना दुसरीकडे कयाधू नदीचे कोरडे पडलेले पात्र चिंतेत भर घालत आहे. नदीला पुन्हा पाणी कथी येणार आणि आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार, असा प्रश्न आता हिंगोली जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आता नदी कोरडी पडल्यामुळे भूजलपातळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो.

कयाधू नदी
Hingoli Court Bomb Threat | हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसरात खळबळ

आगामी उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती

नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कयाधू नदीची सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेणे आवश्यक आहे. नदीपात्रातील उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन, पाणी अडविणे व जिरविण्याच्या उपाययोजना, जलसंधारणाची कामे तसेच टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. कयाधू नदीचे पात्र कोरडेठाक पडल्याने शेतकरी व नागरीकांमधुन चिंता व्यक्त केली जात आहे.

कयाधू नदी
Hingoli Fraud Case : हिंगोली अर्बनमध्ये 61 जणांची 1.68 कोटींची झाली फसवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.