Hingoli Fraud Case : हिंगोली अर्बनमध्ये 61 जणांची 1.68 कोटींची झाली फसवणूक

सहा जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Hingoli Fraud Case
Hingoli Fraud Case : हिंगोली अर्बनमध्ये 61 जणांची 1.68 कोटींची झाली फसवणूकfile photo
Published on: 
Updated on: 

61 people were cheated of Rs 1.68 crore in Hingoli Urban

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा शहरातील नवा मोंढा भागातील हिंगोली अर्बन निधी कंपनीने खातेदारांना १२ टक्के व्याजदराचे अमिष दाखवून १.६८ कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे संचालक व कर्मचारी अशा एकूण सहा जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Hingoli Fraud Case
Hingoli Accident | जांभरून शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

शहरातील नवा मोंढा भागात जयेश खर्जुले याने हिंगोली अर्बन निधी लिमीटेड कंपनी या नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत खातेदारांना त्यांच्या ठेवीवर १२ टक्के व्याजदर तसेच तीन लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला विमा असल्याचे अमिष दाखविले. त्यानंतर खातेदारांनी १३ मे २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत रक्कम गुंतवणुक केली.

दरम्यान, या गुंतवणुकीनंतर काही खातेदारांनी मुदतीनंतर पैसे देण्याची मागणी केली. मात्र कंपनीकडून पैसे देण्यास टाळाटाळ सुरु झाली. या प्रकरणात खातेदार वैभव फटाले यांनी त्यांची आई, वडील, भाऊ, पत्नी व स्वतःच्या नावे गुंतवणुक केलेली १४.२५ लाख रुपयांची रक्कम परत मागितली असता त्यांना रक्कम न देता कंपनीच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी कंपनीला कुलुप लाऊन कंपनी बंद केली.

Hingoli Fraud Case
Narendra Patil : लाभार्थ्यांच्‍या अडचणींवर तत्‍काळ कार्यवाही करा

आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फटाले यांच्यासह इतर ग्राहकांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशी झाली असता त्यामध्ये ६१ खातेदारांची १.५४ कोटी रुपयांच्या रकमेचा संचालक व कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी फटाले यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावरून पोलिसांनी कंपनीचे संचालक जयेश खर्जुले, संतोष धुडकेकर, रोहिण खर्जुले यांच्यासह कर्मचारी दिनेश आनेकर, मोनाली अंबेकर, अजिंक्य खर्जुले यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासणीसाठी वर्ग केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, जमादार विलास सोनवणे, अनिल भुक्तार पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.