Hingoli News | अखंड हरिनाम सप्ताहात सापडलेली दीड लाखाची सोन्याची पोथ केली परत

कळमनुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र सोडेगाव येथील घटना
Gold Ornament Returned  Kalamnuri
Gold Ornament Returned KalamnuriPudhari
Published on
Updated on

Gold Ornament Returned Kalamnuri

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र सोडेगाव येथे श्री संत भोलागिरी महाराज यांच्या ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपदिनी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमादरम्यान एक उल्लेखनीय घटना घडली. सोन्याची नऊ पानांची मनी असलेली पोथ, अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किंमतीची, यात्रेदरम्यान सापडली. ही मौल्यवान वस्तू देवस्थान संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब गोविंदराव पाटील यांचे बंधू माधव गोविंदराव पाटील यांना मिळाली.

आजच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना, इतकी मौल्यवान वस्तू स्वतःजवळ न ठेवता त्यांनी तत्काळ ही बाब संस्थानच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोजकांकडून सर्वत्र जाहीर आवाहन करण्यात आले की, संबंधित व्यक्तीने योग्य ओळख पटवून पोथ स्वीकारावी. तपासणीनंतर ती सोन्याची पोथ शंकरराव बेले यांची असल्याचे स्पष्ट झाले. योग्य खातरजमा करून ती पोथ त्यांना परत देण्यात आली.

Gold Ornament Returned  Kalamnuri
Hingoli Crime | वसमत तालुक्यात १ क्विंटल ७७ किलो अफूची झाडे जप्त; एक जण ताब्यात

या घटनेमुळे सोडेगावमध्ये प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श समोर आला आहे. पैशाच्या व सोन्याच्या मोहापेक्षा सचोटी, नीतीमत्ता आणि समाजाप्रती जबाबदारी मोठी असते, हे माधव गोविंदराव पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

आजच्या भौतिकवादी युगात अशा प्रकारची इमानदारी दुर्मिळ होत चालली आहे. मात्र या घटनेमुळे समाजात अजूनही सदसद्विवेकबुद्धी जिवंत असल्याचा विश्वास दृढ झाला आहे. संतांच्या पुण्यतिथीच्या पवित्र सोहळ्यात घडलेली ही घटना संतांच्या शिकवणीचीच साक्ष देणारी ठरली. गावकऱ्यांकडून माधव गोविंदराव पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचा हा आदर्श समाजातील तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news