Hingoli Water Crisis | बंद मोटारी, फुटलेल्या पाइपलाइन, नादुरुस्त हातपंपांमुळे पाण्यासाठी भटकंती; महिलांचा ग्रा.पं.वर मोर्चा

कळमनुरी तालुक्यातील पोत्र्यात पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला
Kalamnuri  Gram Panchayat Protest
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढलाPudhari
Published on: 
Updated on: 

Kalamnuri Gram Panchayat Protest

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावात पाण्याचे स्रोत उपलब्ध असतानाही देखभाल व दुरुस्तीअभावी त्यांचा वापर होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुठे यांना घेराव घालून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

पोत्रा गावात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठ्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. गावात दोन विंधन विहिरी, तीन जलकुंभ आणि सात ते आठ हातपंप उपलब्ध आहेत. मात्र, काही विंधन विहिरींच्या विद्युत मोटारी बंद पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटल्या आहेत. दुसरीकडे, हातपंपांची दुरवस्था झाल्याने तेही बंद अवस्थेत आहेत. परिणामी, पाण्याचे स्रोत असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Kalamnuri  Gram Panchayat Protest
Hingoli Rising Electricity Bills angry Common Citizens|वीज बिलाच्या वाढत्या आकड्यांनी सर्वसामान्य नागरिक हैराण

ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देऊन बंद पडलेल्या मोटारी, फुटलेल्या पाइपलाइन आणि नादुरुस्त हातपंपांची दुरुस्ती केली असती, तर गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले नसते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुठे यांना घेराव घालून महिलांनी पाण्याअभावी होत असलेल्या गैरसोयींचा पाढा वाचला. 'आम्हाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या,' अशी आर्त मागणी महिलांनी केली. तसेच गावातील सर्व पाणीपुरवठ्याचे स्रोत तातडीने दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Kalamnuri  Gram Panchayat Protest
Contractors blacklisted Hingoli Jal Jeevan|हिंगोलीत जलजीवनच्या कामात दिरंगाई भोवली; चार कंत्राटदार पाच वर्षांसाठी काळ्या यादीत!

या आंदोलनात शंकर मुलगीर, विक्रम रणवीर, प्रभाकर मुलगीर, शामराव रायपुरे, संतोष भुसनर, शिवाजी मुलगीर, तोलाजी मुलगीर, कैलास रणवीर, शंकर रणवीर, माजी सरपंच ज्योती रणवीर, गंगासागर रणवीर, शकुंतला रणवीर, उज्वला रणवीर, प्रेमावती थोरात यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.