Hingoli Heat Wave | खरीपपूर्व मशागत जोमात; वाढत्या उष्णतेत शेतकऱ्यांची कसरत

शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करण्यात व्यस्त
Pre-Kharif Cultivation
शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करताना दिसत आहेत.Pudhari
Published on
Updated on

Pre-Kharif Cultivation

जवळाबाजार : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. यंदा मृग नक्षत्रास ८ जूनपासून सुरुवात होणार असल्याने वेळेत पेरणी पूर्ण व्हावी, यासाठी शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करताना दिसत आहेत.

मे महिन्यात वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत मशागतीची कामे करणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७ नंतर मध्यरात्रीपर्यंत ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागतीची कामे करत आहेत. मृग नक्षत्र जवळ आल्याने मशागतीसाठी ट्रॅक्टरची मागणी वाढली असून ट्रॅक्टर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Pre-Kharif Cultivation
Hingoli News : पोलिस भरतीच्या कागदपत्र पडताळणीसाठी जात असलेल्या तरुणीचा अपघात

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक बागायतदार शेतकरी कापूस लागवडीस सुरुवात करतात. काही शेतकरी पाण्याची उपलब्धता असल्यास मे महिन्यातच कापूस लागवड सुरू करतात. वैशाखातील कडक उन्हामुळे जमीन तापलेली असते. त्यानंतर मृग नक्षत्रातील पावसामुळे जमीन सुपीक बनून पेरणीस पोषक वातावरण तयार होते. मृग नक्षत्रात योग्य वेळी आणि पुरेसा पाऊस झाल्यास पिकांचे उत्पादन चांगले मिळते, त्यामुळे मे महिन्यातील मशागत अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीकडेही वळले आहेत. पेरणीच्या काळात बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आताच खरेदी केली जात आहे. दरम्यान, सध्या विवाहसोहळ्यांचा हंगाम सुरू असल्याने मजुरांची कमतरता भासत असून त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या कामांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news