Young Woman on Her Way to Police Recruitment Document Verification Involved in Accident
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर पोलिस दलात - भरती झाल्यानंतर वैद्यकिय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची - पडताळणीसाठी जात असलेल्या तरुणीचा प्रवासात - अपघात झाला. आता नोकरीची संधी हुकणार अशा अडचणीत सापलेल्या भावी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीला कोल्हापूर पोलिस धावून आले. - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी संबंधित तरुणीशी - संपर्क साधून तुझी संधी हुकणार नाही असा दिलासा दिला. त्यांच्या या वाक्याने तरुणीला अक्षरशः रडू कोसळले.
कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने पोलिस दलातील शिपाई पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया - राबविण्यात आली. मैदानी चाचणी, लेखी परिक्षेनंतर भरती झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर येथे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील सागर रिडे हि तरुणी पोलिस दलात भरती झाली.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन सागर पोलिस दलात भरती झाल्यामुळे तिच्या कुटुंबियाला आकाश ठेंगणे झाले होते. आता घरची परिस्थिती सुधारेल या अपेक्षेने रिठ्ठ कुटुंबिय आनंदीत होते. दरम्यान, आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी सागर रिट्ठे ही शुक्रवारी रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरकडे निघाली होती.
मात्र सांगोला गावाजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या अपघातात सागर ही जमखी झाली. तिला तातडीने उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूरला कसे जायचे याची चिंता तिला लागली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई, वडिलांनी सदर प्रकार सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांना सांगितला. घोंगडे यांनी कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी तान्हाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सागर हिने सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटना माहिती झाली आहे,
तु फक्त तब्येतीची काळजी घे, कागदपत्रे जमा करण्यासाठी सोमवारी आली तरी चालेल, कुठलेही टेन्शन घेऊ नको असे सांगत तिला दिलासा दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला दिलासा आणि त्यांचे शब्द ऐकून सागर हिचे मन भारावून आले. तीला आपले आश्रू रोखता आले नाहीत.