

Radhika Thorwat selection Maharashtra school cricket team
जवळाबाजार : जवळाबाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी राधिका थोरवट हिची शालेय महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेला राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत शालेय महाराष्ट्र क्रिकेट संघात राधिकाची निवड झाली. निवडीनंतर तिचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
या यशाबद्दल बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम, उपाध्यक्ष यादवराव कदम व मुनीर पाटील, डॉ. रमेश नवले, संदिप कदम व इंदिरा गांधी कन्या विद्यालय स्थानिक नियमक मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मुळे, सचिव विक्रम शिंदे, सहसचिव प्रा.गजानन मुळे, मुख्याध्यापक उध्दव राखोंडे, पर्यवेक्षक एच. एल. सावंत, क्रीडा शिक्षक गोविंद मुळे व शाळेतील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाव मिळेल यासाठी त्यांच्या आवडीनुसार स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाकडून दिले जाते. या शाळेतील मुली आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.