हिंगोली: हिवरा जाटू येथे पालकमंत्र्यांकडून पिकांची पाहणी, गोजेगाव येथील मृताच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्त

हिंगोली: हिवरा जाटू येथे पालकमंत्र्यांकडून पिकांची पाहणी, गोजेगाव येथील मृताच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्त
Published on
Updated on

औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिवरा जाटू येथे शेतकरी रुस्तमराव ग्यानबाराव शिंदे यांच्या शेतात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कापूस, ज्वारी, हरभरा पिकाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (दि.१) दुपारी पाहणी केली. Abdul Satar

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, विभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, सरपंच दिपाली लखन शिंदे, गटविकास अधिकारी बालाजी गोरे, तलाठी सुवर्णमाला शिरसाट, मंडल अधिकारी डाखोरे, कृषी अधिकारी पवार आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Abdul Satar

गोजेगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या राजेंद्र जायभाय यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांत्वन पर भेट घेऊन ४ लाखांच्या मदतीचा धनादेश दिला. यावेळी मृत राजेंद्र जायभाय यांची आई, पत्नी दुर्गा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील यांनी कुटुंबीयांना सावरत धीर दिला. व शासनाकडून सर्वतोपरी मदतीचा शब्द दिला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news