Hingoli Drought | दिवाळी आली दारात, दुष्काळ शेतकऱ्यांच्या घरात; खरीप गेला वाया, रब्बीच्या आशा मावळल्या

गोरेगाव परिसरात बळीराजा दुहेरी संकटात, दिवाळी साजरी करायची कशी?
Water, Drought
Drought
Published on: 
Updated on: 

Farmers Crisis Hingoli

गोरेगाव : अंगणात दिवाळीचे दिवे लागण्याची वेळ आली, पण शेतकऱ्याच्या घरात मात्र दुष्काळ आणि काळोख दाटून आला आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातची गेली. आता जमिनीत ओलच नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिली, नंतर जेव्हा पीक जोमात होते तेव्हा पावसाने अचानक पाठ फिरवली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोसल्याच नाहीत, तर तुरीची वाढच खुंटली. शेतकऱ्याने कर्ज काढून केलेला खर्चही निघाला नाही. एकरी 8 ते 10 हजारांचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसला आहे.

Water, Drought
Hingoli News | हट्टा ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांचे दोन वर्षांपासून वेतन थकीत; कुटुंबीयांची दिवाळी अंधारात

जमिनीत ओल नाही, रब्बीचे नियोजन कोलमडले

खरीप गेल्यावर रब्बीवर आशा होती. शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, रब्बी पेरणी करण्याची तयारी केली, पण जमिनीत पुरेशी ओलच नाही. विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्याने पाणीच शिल्लक नाही. भूगर्भातील पाणी पातळी 50 फुटाच्या खाली गेल्याने रब्बीच्या पेरण्या 80% पर्यंत खोळंबल्या आहेत.

दिवाळी कशी साजरी करायची?

बाजारात महागाई वाढली, पण शेतमालाला भाव नाही आणि हातात पीकच नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी मुलाबाळांना कपडे, फराळ, फटाके कसे घ्यायचे? असा प्रश्न गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांसमोर आहे. अनेकांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत आहेत.

Water, Drought
Hingoli News : कर्जफेडीसाठी शेतमजुरांनी विक्रीला काढले घर

कृषी विभागाने तात्काळ या भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा यंदाची दिवाळी गोरेगावकरांसाठी केवळ दिव्यांविनाच राहील, अशी स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.