Hingoli Congress protest : मुख्य निवडणूक आयुक्तांना तत्काळ बडतर्फ करा

काँग्रेसकडून ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध
Hingoli Congress protest
Hingoli Congress protest pudhari photo
Published on: 
Updated on: 

हिंगोली : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करावे यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, जेष्ठ नेते जकी कुरेशी, सुरेश सराफ, मिलींद उबाळे, डॉ. रमेश शिंदे, भगवान खंदारे, शेख जुबेर, संतोष राजेगोरे, नंदकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Hingoli Congress protest
Anushka Sharma: अनुष्का शर्माच्या एका पोस्टने बदललं छोले-भटुरे विकणाऱ्या हॉटेलचं नशीब; 18 लाखांच कर्ज होतं आता थेट 2 कोटीं विक्री

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र मागील काही वर्षापासून निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनले असून निवडणूक आयोग भाजपासाठी निवडणूकीत मॅच फिक्सिंग करीत असल्याचा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने आयोगातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. एसआयआरच्या नावाखाली मोठ्या संख्यनेने मतदारांची नावे वगळली जात असून हे लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी असलेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे हुकुमशाह पध्दतीचे असून पश्चिम बंगाल निवडणूकीच्या वेळी ९२ लाख मतदार वगळले, बिहारमध्येही लाखो मतदार वगळण्यात आले तर महाराष्ट्रात २०२४ च्या निवडणूकीत ४७ लाख बोगस मतदार वाढविल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Hingoli Congress protest
Nanded Crime : पोलिसांकडून सात जणांना बेड्या

या प्रकारामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामागणीचे निवेदनही प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news