Vasmat Gas Raids | घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर; २५ हॉटेलवर छापे, ६ जणांवर कारवाई

सहा ठिकाणी नियमभंग आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई
Domestic LPG Misuse in Hotels
Domestic LPG Misuse in HotelsPudhari
Published on
Updated on

Domestic LPG Misuse in Hotels

वसमत : वसमत शहरातील काही हॉटेल व्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने सोमवारी (दि.१६) शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २५ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून सहा ठिकाणी नियमभंग आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वसमत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गॅसचा काळाबाजार होऊ नये आणि घरगुती सिलिंडरचा गैरवापर थांबवण्यासाठी पुरवठा विभागाने शहरातील विविध भागांतील हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकून तपासणी केली.

Domestic LPG Misuse in Hotels
Vasmat Tree Cutting : वसमतमध्ये फळझाडांची सर्रास कत्तल; वनविभागाच्या नाकावर टिच्चून कटाई सुरू

या तपासणीत सहा हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित हॉटेल चालकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वसमतचे पुरवठा अधिकारी पांडुरंग हांडे यांनी दिली.

माऊली स्पेशल चहा, अन्ना इडली सेंटर अँड चायनिज, माऊली रगडा कॉफी, लयभारी गुळाचा चहा व मिसळपाव, सह्याद्री उपहारगृह (मोंढा रोड) तसेच हॉटेल मेरे गरीब नवाज (मामा चौक) या सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुरवठा अधिकारी पांडुरंग हांडे, गणेश जाधव आणि राहुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Domestic LPG Misuse in Hotels
Vasmat Accident | वसमत - परभणी महामार्गावर ऑटो पलटी होऊन एकजण ठार, तीन महिला जखमी

घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरणे नियमबाह्य असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाकडून पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news