Basmat Crime | वसमत हादरले; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणाचा दगडांनी ठेचून खून

वसमत शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
Hingoli Basmat  Youth Stoned To Death
गणेश गुंडाळेPudhari
Published on
Updated on

Hingoli Basmat Youth Stoned To Death

वसमत : वसमत शहरातील सोमवारपेठ परिसरात पोलिसांना माहिती (टिप) दिल्याच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाची दगड व विटांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१०) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश डिगांबर गुंडाळे (वय २२, रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. पाटीलनगर, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास सोमवारपेठ येथील बिट क्रमांक ४ परिसरात ही घटना घडली.

Hingoli Basmat  Youth Stoned To Death
Hingoli farmers face drought and inflation - पावसाची दडी अन्‌ दुष्काळाचे संकट, महागाईने शेतकरी चिंतातूर

या प्रकरणी पवन माणिकराव डाखोरे (वय २७, रा. पळसगाव, ता. वसमत) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून रुषीकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी व अनिकेत देवकर (सर्व रा. वसमत) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ०५७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, "तू पोलिसांना टिप का देतो?" या कारणावरून आरोपींनी संगनमत करून गणेश गुंडाळे यास दगड व विटांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Hingoli Basmat  Youth Stoned To Death
Hingoli Accident | कळंबा पाटीजवळ भीषण अपघात 3 प्रवाशी ठार तर 5 गंभीर जखमी!

सकाळी ७.४९ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार व पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news