Aundha Nagnath Accident | औंढा नागनाथ–परभणी मार्गावर दूध वाहतूक टेम्पो - दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे गंभीर

खंडेश्वरी मंदिर ते नागनाथ महाविद्यालय परिसरात साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात
Aundha Nagnath Parbhani Road Accident
भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक Pudhari
Published on
Updated on

Aundha Nagnath Parbhani Road tempo bike collision

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ–परभणी मार्गावर खंडेश्वरी मंदिर ते नागनाथ महाविद्यालय परिसरात बुधवारी (दि. १) रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

या अपघातात शिवम हरिभाऊ चौरे (वय २५, रा. पिंपळा, ता. वसमत) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप दत्तराव सवंडकर (वय २०, रा. टेंभुर्णी, ता. वसमत) आणि अमजदखा शरीफखा पठाण (वय १९, रा. कातनेश्वर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Aundha Nagnath Parbhani Road Accident
Hingoli News : राजर्षी शाहू कॉलेजच्या इमारतीला आग

माहितीनुसार, दूध डेअरीचा टेम्पो (क्र. MH-38 X 4491) औंढा नागनाथकडे येत होता. त्याचवेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून युवक औंढा नागनाथहून वसमतकडे जात असताना खंडेश्वरी देवी मंदिराजवळ हा अपघात झाला.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस आणि पोलीस अंमलदार ओंकारेश्वर रांजणेकर हे परभणी कारागृहातून परत येत असताना त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांना कळवून १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले.

Aundha Nagnath Parbhani Road Accident
Hingoli News : तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई

एपीआय खयामुद्दीन खतीब व राजाराम कदम यांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे औंढा नागनाथ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news