Aundha Nagnath Nagar Panchayat | नगरपंचायतीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दीड वर्षांपासून थकीत वेतन; मंजूर निधीतून प्रश्न मार्गी लागणार का?

पंधराव्या वित्त आयोगाकडून 1 कोटी 58 लाखांचा निधी आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नातून मंजूर
Aundha Nagnath Nagar Panchayat issues
Aundha Nagnath Nagar Panchayat (Pudhari Photo)
Published on
Updated on

Aundha Nagnath cleaning staff salary issue

औंढा नागनाथ : नगरपंचायतीला जवळपास दहा वर्षे पूर्ण होत असताना, ग्रामपंचायत काळातील कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाकडून 1 कोटी 58 लाख 44 हजार 780 रुपयांचा निधी आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून, या निधीतून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा निधी 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी मंजूर झाला असून, लवकरच नगरपंचायतीच्या खात्यावर जमा होणार आहे. आता प्रभारी मुख्याधिकारी रविराज दरक या निधीचा वापर कशा पद्धतीने करतात, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

Aundha Nagnath Nagar Panchayat issues
Hingoli News : तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई

या निधीपैकी 95 लाख 68 हजार 68 रुपये लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर शहरातील मूलभूत सुविधांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. तर उर्वरित 63 लाख 67 हजार 912 रुपये शहरातील स्वच्छता, नाली साफसफाई, झाडलोट, नवीन नाल्यांचे बांधकाम, रस्ते दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यासारख्या कामांसाठी वापरणे बंधनकारक आहे.

या निधीमुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता असली तरी, सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन. नगरपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे आणि कर वसुलीतील ढिलाईमुळे आर्थिक स्थिती बिघडली असल्याची टीका होत आहे.

Aundha Nagnath Nagar Panchayat issues
Hingoli News | हट्टा ग्रामपंचायतीचा 'रामभरोसे' कारभार: ग्रामसेवक १० दिवसांपासून बेपत्ता, नागरी सुविधांचा बोजवारा

आता जर मुख्याधिकाऱ्यांनी या निधीतून प्राधान्याने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले, तर केवळ त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांच्या कुटुंबीयांची उपासमारही थांबेल. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news