

Aundha Amdari woman dies post delivery
हिंगोली: जिल्ह्यातील चोंडी येथील एका महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२२) पहाटे घडली. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्याचा आरोग्य विभाग हादरला आहे. या घटनेचे डेट ऑडिट केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्राने सांगितले.
याबाबत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथील ग्रामीण व दुर्गम भागातील महिला द्रौपताबाई पोटे (वय 20) या गरोदर होत्या. आरोग्य विभागाच्या स्थानिक पथकाने त्यांची नोंद घेतली होती त्यानंतर त्यांना कधी आमदरी तर कधी त्यांच्या माहेरी चोंडी येथील लसीकरण करण्यात आले होते. याशिवाय त्यांना आहाराबाबत वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात आले .दरम्यान गुरुवारी दिनांक 21 रोजी सकाळी त्यांना प्रसूती कळा येत असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून नॉर्मल प्रसुती केली. मात्र बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, बाळाच्या मानेभोवतीं नाळ गुंडाळली गेली होती, प्रसुती नंतर अतिरक्तस्त्राव होऊ लागला .
त्यामुळे औंढा नागनाथ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस यांनी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.
यासंदर्भात डॉक्टर दीपक मोरे यांनी सांगितले की सदर महिला अत्यवस्थ अवस्थेत आणण्यात आली होती. तातडीने उपचार सुरू करून दोन बाटल्या रक्त देण्यात आल्या. त्यानंतर प्रसंगी शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. तोपर्यंत वेळच मिळाला नाही. त्या महिलेच्या बाळाची तब्येतही गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून बाळाचे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचे डेथ ऑडिट केले जाणार आहे.
यामध्ये सदर महिला गरोदर असल्यापासून ते प्रसूती होईपर्यंत दिलेले उपचार , लसीकरण, आहार याबाबत माहिती घेतली जाणार असून यामध्ये कुठे कुठे चूक झाली. याची चौकशी होणार आहे. गरोदर महिलेला दिले जाणारे गरोदरपणातील व शक्तीवर्धक टॅबलेट तसेच रक्त वाढीसाठी दिलेली जाणाऱ्या टॅबलेट व मासिक तपासण्या केल्या गेल्या की नाही . महिलेला औंढा नागनाथ येथे दाखल केल्यानंतर औंढा नागनाथ येथे तिच्या नॉर्मल प्रसूतीची वाट का बघितली किंवा त्या महिलेला तात्काळ हिंगोली येथे पुढील उपचारासाठी रवाना का नाही केले?असे अनेक प्रश्न सामान्य जनतेतून विचारल्या जात आहेत.