Firing Case : कळमनुरीत गोळीबार; १ ठार

आरोपींमध्ये शिंदे गटाचा नगरसेवक, शहरात तणाव
Firing Case
Firing Case File Photo
Published on
Updated on

Firing in Kalamnuri; 1 killed

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जुना बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दोन गटांतील जुन्या वादाने हिंसक रूप घेतले. यावेळी एका गटाने केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर चौघे जखमी झाले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत शिंदे सेनेच्या एका नगरसेवकासह १५ जणांना ताब्यात घेतले.

Firing Case
Crime News : नागपाड्यात मध्यरात्री शहरातील पोलिसांचा थरार

शहरात मागील काही दिवसांपासून दोन गटांत वाद होत होते. हा वाद रात्री उफाळून आला. जुना बसस्थानक परिसरात लुकमान सिद्दीकी व शेख शकील गट समोरासमोर आले. यामध्ये शकील गटातील एकाने गावठी पिस्तुतद्वारे गोळीबार केला. या गोळीबारात लुकमान सिद्दीकी (वय ३८) यांचा मृत्यू झाला तर ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान पठाण, मेहराज पठाण हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जमीर नाईक यांनी घटनास्थळी पोहचत जखमींना रुग्णालयात हलवले.

घटनेचे गंभीर्य घेत पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. याप्रकरणी इम्रान पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख शकील, शेख जम्मू, शेख जमीर, शेख समीर, अजहर पठाण, शाहीन नाईक, फयुम नाईक, शेख फारूक, शेख शहबाज, सय्यद फारूक, मुस्तकीम, इम्रान खान, शिबगत ऊर्फ शिब्बू तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक किशोर भालेराव या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Firing Case
Jalana News | अवैध मांसविक्री आणि गोसेवकांवरील हल्ला: सिंदखेडराजा मध्ये तीव्र पडसाद, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

२ तास ठिय्या आंदोलन

मृतदेह हिंगोलीवरून शवविच्छेदन करून कळमनुरी येथे रुग्णवाहिकेद्वारे आणल्यानंतर नातेवाईकांनी जुना बसस्थानक परिसरात रुग्णवाहिका अडवून दोन तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत आरोपीस अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news