Jalana News | अवैध मांसविक्री आणि गोसेवकांवरील हल्ला: सिंदखेडराजा मध्ये तीव्र पडसाद, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
meat sale ban
meat sale banPudhari Photo
Published on
Updated on

देऊळगाव राजा : राजस्थानमधील गोसेवकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेनंतर शनिवारी सिंदखेडराजा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेतील आरोपींना तातडीने अटक करावी तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर सुरू असलेल्या उघड्यावरील मांसविक्रीवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गो सेवा सन्मान’ अभियानांतर्गत राजस्थान येथील प्रल्हादसिंग, बाळकृष्ण महाराज व केशव नागर हे प्रवास करीत असताना सिंदखेडराजा शहराजवळ गोवंश वाहतूक करणारे वाहन दिसल्याने त्यांनी त्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शहरातील काही भागात वाद निर्माण झाला. त्यानंतर बसस्थानक परिसरात गोसेवकांना काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाणे आणि बसस्थानक परिसरात जमा झाले. संबंधित हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी बसस्थानकासमोर रास्ता रोको करून निषेध नोंदविला.

meat sale ban
Thane Crime : मिरा रोड सोसायटीत बकरे आणल्याने वाद चिघळला

आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. पोलिसांनी कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आंदोलकांनी आरोपींना अटक करण्यासोबतच बसस्थानक, ऐतिहासिक प्रवेशद्वार व रामेश्वर मंदिर परिसरातील उघड्यावरील मांसविक्रीची दुकाने हटविण्याची मागणी लावून धरली. या मागण्यांमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण राहिले.दरम्यान, प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अंदाजे १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

meat sale ban
Pune Police Crackdown: बालाजीनगर हल्ल्यानंतर पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त; सर्वसामान्य व्यावसायिकांना फटका

शांतता राखण्याचे आवाहन

उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी नागरिकांना शांतता व संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. "घटनेचा तपास निष्पक्षपणे सुरू असून कोणालाही कायदा हातात घेऊ दिले जाणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे," असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news