

Father Daughter Abuse Case Hingoli Akhada Balapur Police
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका ३७ वर्षीय वडिलाने आपल्या बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडिलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आखाडा बाळापूर येथे मुलीचे वडील मनोहर नामदेव मुरमुरे यांनी आपल्या अल्पवयीन बारा वर्षांच्या मुलीसोबत डिसेंबर २०२४ मध्ये स्वतःच्या घरी आपल्या सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. पीडित मुलीची नांदेड येथील शासकीय रूग्णालयात तपासणी करून तिच्या जबाबावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपासून पीडित मुलीचे आई वडील मजुरी करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मनोहर मुरमुरे यांना दारूचे व्यसन आहे. त्यांनी दारूच्या नशेत डिसेंबर २०२४ मध्ये आपल्या मुली सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिला तपासणी साठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. पित्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, शिवाजी पवार, चालक जाधव पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वगे करीत आहेत.