Hingoli Agriculture News : पाण्याअभावी शेतकऱ्याने तीन एकर हळदीवर फिरवला रोटर

तालुक्यातील गौळबाजार येथील शेतकरी गुलाब मुधळ यांच्यावर पाण्याअभावी उभ्या हळदीच्या पिकावर रोटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
Hingoli Agriculture News : पाण्याअभावी शेतकऱ्याने तीन एकर हळदीवर फिरवला रोटर
Published on: 
Updated on: 

Due to a lack of water, a farmer ran a rotavator over three acres of turmeric crops

कळमनुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गौळबाजार येथील शेतकरी गुलाब मुधळ यांच्यावर पाण्याअभावी उभ्या हळदीच्या पिकावर रोटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तीन एकर हळदीच्या लागवडीपासून संगोपनापर्यंत तब्बल तीन लाख ५० हजार रुपये खर्च करूनही हाती काहीच येणार नसल्याने त्यांनी अखेर उभे पीक उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.

Hingoli Agriculture News : पाण्याअभावी शेतकऱ्याने तीन एकर हळदीवर फिरवला रोटर
Hingoli RTO : अवाजवी भाडे आकारल्यास कारवाई

हळद पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाण्याची उपलब्धता नसल्याने पीक वाचवणे अशक्य झाले. लाखो रुपये खर्च करून डोळ्यांत स्वप्ने घेऊन पिकवलेली हळद पाण्याअभावी वाया जात असल्याचे पाहून शेतकरी गुलाब मुधळ यांना अखेर तीन एकरांतील उभ्या पिकावर रोटर फिरवावा लागला.

Hingoli Agriculture News : पाण्याअभावी शेतकऱ्याने तीन एकर हळदीवर फिरवला रोटर
Hingoli News : हळदीवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

आधीच शेतीचा वाढता खर्च, पिकांना मिळणारा अपुरा भाव आणि आता पाणीटंचाई अशा संकटांनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. साडेतीन लाख रुपये खर्च करूनही हातात काहीच न पडल्याने गुलाब मुधळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पाणीटंचाईमुळे शेती उद्ध्वस्त होण्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.