

Desecration of a Corpse; Case Registered Against Three Individuals
आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) :
प्रेताची अवहेलना केल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात (दि.२० एप्रिल रोजी) पेठ वडगाव येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून विष्णुकांत तुकाराम गुठे (वय ५७, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बालाजी मारोती देवकर, सोमिनाथ मारोती रणखांब व निकेश दत्ता गायकवाड (सर्व रा. पेठ वडगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालय परिसरात ही घटना घडली.
संशयित आरोपींनी मदत न करता व चुकीची माहिती देत, उत्तरीय तपासणी आणि पंचनामा करू दिला नाही व प्रेताची अवहेलना केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गोणारकर करत आहेत. अद्याप संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
कळमनुरी तालुक्यातील पेठ वडगाव शिवारात ( दि.१९ एप्रिल रोजी) एका अंध आदिवासी युवक नवनाथ प्रकाश लाखाडे यांचा झाडाच्या फांदीला रुमालाने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी मृताचे भाऊ नागनाथ प्रकाश लाखाडे यांनी प्रेताची उतरीय तपासणी करू देणार नाही. जोपर्यत अभिषेक उमाकांत सातपुते. नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात ज्यूनियर क्लर्क आहे. त्याच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपविण्यास भाग पाडले म्हणून गुन्हा दाखल होईपर्यंत उतरीय तपासणी होऊ देणार नाही अशी मागणी केली. यावेळी पेठ वडगाव व परिसरातील शेकडो महिला पुरुष याच मागणीसाठी पोलीस ठाण्यात दिवसभर बसून होते.